मस्करीचा भाग सोडून विचार करावा.....
मनोगतावर जे साहित्य वाचायला मिळाले आहे ते सर्व त्या साहित्यिकांना इतरत्र प्रकाशीत करता आले असते का ?
त्या साहित्याला मिळालेल्या उत्स्फूर्त व मनमोकळ्या प्रतिक्रिया मोठमोठ्या साहित्यकारांच्या नशिबात आल्या आहेत का ?
लेखन वा साहित्याचा कुठलाही प्रकार असो, नाकारण्याचे संपूर्ण हक्क प्रकाशकाला आहेत ना ?
येथे प्रकाशक नाहीत तर प्रशासक आहेत - त्यांनी सभ्यतेच्या बंधनाला धरून केलेले कुठलेही साहित्य कधी नाकारले आहे का ?
कोण कुठला माधव कुळकर्णी वा प्रसाद शिरगांवकर......
त्यांचे धडपडत केले गेलेले प्रयत्न विविध रितीने आजवर येथे वाखाणले गेले आहेत !
धन्यवाद मनोगत, धन्यवाद प्रशासक !