पुण्यापासून अंदाजे ५०कि.मी. वर भुलेश्वर हे देवस्थान आहे. माहितीनूसार हे पांडवकालीन असून मूर्तिकाम पाहण्यासारखे आहे. लढाईच्या काळात ब-याच मूर्त्याची तोडफ़ोड करण्यात आली.
माझ्या आयुष्यातील [आतापर्यंतच्या,] स्त्री रुपातील गणपतीची मुर्ती मी पहिल्यांदाच या मंदिरात पाहिली.
गाभा-यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पुजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. [लढाईचाच परिणाम] पिंडीवरील खोलगट भागात मिठाई किंवा पेढा ठेवल्यास तो खाल्ल्याचा आवाज ऐकू येतो. [मी पुजेच्यावेळी नव्हतो.]
मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. मी घेतलेली काही छायाचित्रे खाली आहेत.
महाराष्ट्रातील अधिक स्थळांबद्दल माहितीसाठी माझे माझी भटकंती हे संकेतस्थळ पाहा.
आभार,
सर्जा