लिखाळ ही एक जमात आहे. तिला आपण भटकीसुद्धा म्हणू शकतो. ह्या जमातीचे अस्तित्व इ. स. पूर्व १३ व्या शतकापासून सापडते. सदर कावळा हा उडायचे विसरून गेल्याने ज्ञातीपासून भरकटला असावा. आता आपण सर्वांनी त्याचे जंगी स्वागत केल्याने त्याला पुन्हा पंख फुटतील. ह्याचे अस्तित्व वर्तमानात पण मूळ प्राचीन असल्याने त्याच्या येण्याने एक जीर्ण परंपरा पुनरुज्जीवित होईल असे वाटते. अशा लोकांना लिव्हींग फॉसिल्स म्हणायला हरकत नसावी.
लिखाळ ही व्यक्ती सर्व विषयांना गवसणी घालणारी, तथाकथीत भावनोत्कट वगैरे गोष्टींना थारा न देणारी असावी असा कयास आहे. आता सावधपणे लिहीले पाहिजे. नाहीतर हा लिखाळ उडत उडत कधी डोक्यावर येईल सांगता येत नाही. तेव्हा सावधान... लिखाळ आला आहे.
शुभेच्छुक,
नितीन पोरे.