वा वा प्रसादराव! विडंबन मात्र खूपच सुंदर साधलंय हं तुम्हाला! आता इथले गंम आणि टाम प्रथितयश(प्रथितयश म्हणजे अर्थातच प्रसिद्धिच्या बाबतीत! ) आणि तरीही बुरख्यामागे लपणाऱ्या टोम (टोपणनावधारी मनोगती हो!) पैकी तुमचे आयडी नक्की किती आणि कोणते याचा काथ्याकूट रेघेबाहेरच्या(ऑफ लाईन),रेघेवरच्या आणि मनोगतावरच्या!!!(व्य. नि.) चर्चांमधून कितीतरी दिवस करणार!(विडंबनकार आणि गज़लकार या दोन्ही रूपात तुम्ही अगदी फिट्ट बसता! त्यातून पत्र्या मारुती,खुन्या मुरलीधर, जिलब्या मारुती इ. गोष्टींवरून तुमचं अस्सल सदाशिवपेठी पुणेरीपण अधोरेखित होतं! शिवाय तुम्ही पूर्वी परदेशाहून मनोगताला भेट देणारे होतात म्हणजे जुन्या आयपीज् चा छडा लावण्याचीही सोय झाली! म्हणजे तर शेरलॉक होम्स मनोगतींना अगदी घबाडच की हो मिळालं... आता आपण कोण कोण आहोत हे पाहिल्यावर तोंडात बोट घालायची पाळी तुमच्यावर येणार बघा! हाहाहाहा जनहो आणि प्रसादराव, हघ्याहेसांनल अशी अपेक्षा आहे......)
मस्त झाला आहे हाही भाग. आणि कथेनेही छान पकड घेतली आहे आता .बोगनवेल-सदाफुलीचे हार-गजरे (बापरे बोगनवेलीचे हार डोळ्यापुढे आले आणि ते घातलेला जिलब्या मारुती मंडळाचा गणपती एकदम हवाईयन वाटू लागला !!!), थरथरत्या माऊसने उघडलेले विडंबन या कल्पना फारच छान! खूप आवडलं. लिहीत रहा. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे
(एका दगडात अनेक पक्षी मारणारी)अदिती
(तेवढं पुढचे भाग लिहिण्यासाठीच्या वेळाबद्दलचं माझं मत मात्र मागील भागावरील प्रतिक्रियेप्रमाणेच!)