मी, खाली सही करणारा, प्रसाद शिरगांवकर,  असे जाहीर निवेदन करु इच्छितो की मनोगत वर माझी 'प्रसाद' ही एक, एक आणि एकमेवच आयडी आहे. ही आयडी सोडून इतर कोणत्याही आयडीशी माझा शारिरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक, वैयक्तिक, नैतिक, अनैतिक, लौकिक, पारमर्थिक... असा कोणताही संबंध नाही... तरीही असा कोणता संबंध आहे असे कोणास वाटल्यास, भास झाल्यास, अनुमान काढल्यास, बादरायण संबंध जोडल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही वादास वा चर्चेस सदरहू लेखक जबाबदार नाही असे विनम्र नमूद करू इच्छितो.

स्थळ - पुणे
दिनांक - १३ फेब्रुवारी २००६

सही /-

प्रसाद शिरगांवकर