व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान
प्रत्येक फूल, तो खळाळता झरा,
आणि मी, सारे जण फक्त
तुझीच वाट पाहतात आहेत...
तू येच आज,
नाहीच जमले यायला तरी...
तुझा होकार तरी कळव...
मला तू फक्त 'हो' म्हण !