आवडली .. तरी पण तिसरा भाग याहून जास्त उत्कंठावर्धक होता हो!

नेट कॅफेवाल्याने चिंटू-मिनीला बाहेर काढलं हे फार वाईट झालं. दोन बिचारे हताश मनोगती शनिवारी शनिपाराच्या पायऱ्यांवर बसलेत ...(म्हणजे हा शनिपार 'त्या' शनिपाराजवळ नसणार! तिथे बसायला शनिवारी मध्यरात्रीही जागा नसते म्हणतात!) बापरे बापरे काय कल्पना आहे... आता इथे बहुतेक नवग्रह स्तोत्र, आरत्या,(व्हॅलेंटाईनची तर आलीच आहे ऑलरेडी ... प्रसादराव अजून एक डी सापडला बघा!) आणि काय काय यांचं पेव फुटणार बहुतेक... मनोगतीय साहित्याच्या रकान्यांमधे पूजासाहित्य अशी एक मोलाची भर घातली जाणार ! (जाहीर प्रकटन माझा कोणत्याही धार्मिक साहित्याला(लिखित बरं का) विरोध नाही तसंच माझं पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंचं शनिपाराजवळ दुकानही नाही!) असो कल्पना भारीच रोमांचक वाटली तुमची म्हणून हा प्रतिसादप्रपंच!(अर्थातच ह्घ्याहेसांनलहेओआ).....

अदिती

(सध्या एकूण कवींवर संक्रांतच (की शनीची वक्रदृष्टी???... साडेसाती नाही हो ती तर कायमच असते)  दिसतेय! त्यांना चंद्रावर काय पाठवलं जातंय,धमक्या काय दिल्या जाताहेत. त्यांच्या प्रोफेशनल ट्रिक्स आणि ट्रेड सीक्रेट‌्स त्याचेच बंधुबांधव जाहीर काय करून टाकतायत! कसं रे होणार देवा?  शिव शिव! हर हर महादेव!)