हाहाहा.. झक्कास चालला आहे खेळ. अजूनही येऊ देत कल्पना. :D 

लगे हाथों मीही एक तोडकामोडका प्रयत्न करते.

व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी एकेक पान
तुझ्याच होकारास्तव आता
आसुसले हे माझे प्राण

हरेक श्वास हरेक क्षण
तुझ्याच शब्दांना तारण
प्रतिक्षा थांबव जीवघेणी
मला तू फक्त 'हो' म्हण !

- वेदश्री.