व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान
चालतोय आपण कित्येक तास
कालपासुन नाहीये पोटात घास
जंगलात फिरण्याचा तुझा हा बेत
तरी मी बरोबर नव्हतो येत
चालुन चालुन थकले पाय
आपला अंत इथेच काय?
प्रिये!! तो बघ दिसला उपाय
सुदृढ गाढव भरभक्कम पाय
जरि तु थोडी वजनदार
सहज ते पेलेल दोघांचा भार
त्यावर जाऊन बसुया पटकन्
आता विचार नको प्रिये, मला तू फक्त 'हो' म्हण !