व्याकुळलेलं हिरवं रान
यकेक फांटी यकेक पान
प्वार आमचं रडत हुतं
असं धन्यास्नी पडलं सपान

जानून घे द्येवा आमचं मन
औंदा तरी बरसव पान्याचं धन
पावसाचं वरदान मागतीया म्या
तू मले फकस्त 'हो' म्हन ! 

- वेदश्री.