व्याकुळलेले हिरवे रान
एकेक फांदी एकेक पान
रेंगाळलेले क्षण
आणि तुझी आठवण

वाट बघतेय माझे मन
कधी माझी होशील तू
प्रेमाचे रंग सारे
माझ्यावरी उधळशील तू

करीन वर्षाव फुलांचा
असा करतो आहे पण
दे संधी एकदा
मला तू फक्त हो म्हण