व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान
माझे सर्व कागदी बाण
पायी तुडविलेस?छान!
तू पेन मी टोपण
तू मयुरी माझे नर्तन
अर्थअशून्य माझे लेखन
तुझ्या साठी सोडले व्यसन,
रोज सर्व कपडे धुणं,
स्वच्छ भांडी विसळणं,
रात्री दह्याला लावीन विरजण,
मला तू फक्त 'हो' म्हण !