माझा हा पहिलाच प्रयत्न. बघूया कसे जमले! कृपया चू. भू. द्या. घ्या.
व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान
भऱ्या शेतात झुलतंय धान
वाफाळ वारा जरी बेभान..
चल गं पिल्लू होऊनी मोर
करु साजरा आषाढी क्षण
बोलवूया घन काळेभोर,
मला तू फक्त 'हो' म्हण !
हा खेळ खूप आवडला.. बऱ्याच लोकांची कृति, कल्पना, सुंदर आणि खोडकर
विचार वाचून खूप छान वाटले.
- परिमा