नमस्कार ,
ह्या सन्केतस्थळाची माहिती मिळाली आणि लगेच भेट दिली. मनापासून बरे वाटले. या सन्केतस्थळाला एक नाव सुचवू इच्छितो. पसायदान! ज्ञानेश्वराने जे देवाकडे अवघ्या जगासाठी मागितले ते पसायदान आणि ते सुद्धा मराठी भाषेतुन ! मग जगभरातल्या मराठी माणसाना जोडणार्या सन्केतस्थळाला त्याच पसायदानाचे स्वरुप नाही का येत? अम्रुताते पैजा जिन्कणार्या मराठीसाठी दुसरे वैश्विक नाव मला तरी सुचलेले नाही.
चित्तचक्षु