१. कार्ला लेणी - पुण्यापासून अंदाजे ४० कि.मी. वर कार्ल्याची प्रसिध्द लेणी आहेत. माझ्या वाचनानूसार ही लेणी २००० वर्षे जूणी आहेत. ही बौद्ध लेणी म्हणजे स्थापत्यशास्त्राचे एक अप्रतिम उदाहरण आहे. तेथेच एकविरा देवीचे मंदिरही आहे. देवीची मूर्ती अतिशय कोरीव असून डोळे अगदी जिवंत वाटतात.
मी काढलेली काही छायाचित्रे खाली आहेत.
नकाशा - इंडियाट्रव्हलाईट.कौम
२. भाजा लेणी - कार्ल्याच्या अगदी विरुध्द दिशेला ही भाजा लेणी आहेत.
३. बेडसा लेणी - अंदाजे कार्ल्याच्या दक्षिणेस १० कि.मी. वरती, कामशेत रेल्वे स्टेशन जवळ, बेडसे हे छोटे गाव आहे. येतील लेणी आकाराने छोटी आहेत मात्र आकर्षक आहेत.
सकाळी लवकर निघालात तर तीनही लेणी एका दिवसात पाहता येतात.
अधिक माहिती व छायाचित्रांसाठी माझी भटकंती पहा.
आभार,
सर्जा.