विकीवरील कथा/रचना (विकीबुक्स) मुख्यतः बौद्धिक संपदा अधिकाराच्या कक्षेबाहेर आलेल्या व सुप्रसिद्ध असणे अपेक्षित आहे.
विकीचा (विकीपीडिया) मूळ उद्देश माहिती हा असल्याने प्राचीन वा पुराणकालीन कथा माहिती म्हणून देता येतील की नाही याबद्दल साशंकता आहे. सणवारा वा पौराणिक व्यक्तिंसंबंधीच्या कथा मात्र त्या सणाशी वा व्यक्तिशी संलग्न लेखात थोडक्यात (माहितीवजा) देता येतील.
वरील कथेचा सारांश बनवून तो इतिहास वा अख्यायिका म्हणून, महिदास यांच्या विषयीचा लेख बनवून, समाविष्ट करता येईल.