माझ्या मते शिव जन्माच्या वेळी शहाजी राजे जिजाउंच्या जवळ होते.  ह्याला कारणही देता येईल. शिव जन्माच्या आधीही शहाजी राजांनी स्वराज्य स्थापन्याचा प्रयत्न केला होता.  त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही आले. पण त्याच वेळी त्यांचा बिमोड करण्यासाठी सर्व यवन शक्ती एकत्र आल्या व शहाजींचा पराभव झाला.  नेमक्या त्याच काळात जिजाबाई गरोदर होत्या.  त्या काळात त्यांना पुण्याहुन शिवनेरीला तातडीने हलविण्यात आले. त्यानंतर शहाजींनी आदिलशहाशी हातमिळवणी केली.  पण मराठी माणसांवरील त्यांच्या प्रभावामुळे आदिलशहाने त्यांना महाराष्ट्रापासून दुर म्हणजे बंगळूर ला पाठविले.  त्यानंतर शहाजी राजे मायदेशी कधी परतु शकले नाहीत.  मध्यंतरी शहाजींनी जिजामाता, बाळ शिवबा यांच्या सोबत दादोजींना पाठवून पुण्याचा कारभार पाहण्यास सांगितले.

अर्धवट माहिती बद्दल क्षमस्व

-आशिष