लिखाळ हे नुकतेच मनोगताचे सदस्य झाले आहेत. त्यांच्या पहिल्या लिखाणाला(कावळ्याचे मनोगत) प्रतिसाद देताना आम्ही म्हटले होतेः सावधान... लिखाळ आला आहे.
त्यांच्या लिखाणातले नाविन्य आम्हाला भावले. त्यांचा व्यवसाय इ. शोधण्याचा प्रयत्न केला. सापडले नाही. हा नक्कीच कोणी खराखुरा प्रतिभावंत एथे लिहीत असावा. आता मनोगतावरील तर्कप्रवण लोक थोडे नर्मप्रवण होतील, अशी आशा करायला हरकत नाही.