वर्तमानपत्रात द्यायचं हे मान्य आहे, पण कसं? कोणाकडे? मी या आधी कधी कुठलं साहित्य प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न करून पाहिलेला नाही, त्यामुळे मला याबद्दल काहीच माहिती नाही. समजा सकाळ मध्ये एखादं साहित्य द्यायचं झाल्यास त्यानुषंगाने त्यात एखादं सदर आहे की नाही हे शोधून त्याच्याशी निगडीत त्यांनी दिलेल्या पत्त्यावर साहित्य पाठवायचं असं काही आहे का? यासाठी मला सर्व वर्तमानपत्रे आठवडाभर घ्यावी लागून बरंच संशोधन करावं लागेल असं दिसतं आहे. मासिके,पाक्षिके वगैरे प्रकार तर मग मी विसरलेलेच बरे ! :((

उपाय सुचवल्याबद्दल धन्यवाद, माधव.