विलास,

जितक्या हिरीरीने तुम्ही हा बदल ( जो तितकासा महत्त्वाचा नव्हता ) टिपलात त्याच्या १% जरी माझ्या चौकशीकडे लक्ष देऊन त्याबद्दल उपाय शोधून सुचवायचाही प्रयत्न केला असतात, तर फार बरं झालं असतं.

आता तुमच्या इथल्या ( अप्रस्तुत ) प्रतिसादाबद्दल :

सर्वात आधी तर मी मनोगती माधव कुळकर्णी यांना माधवमामा म्हणते, माधवकाका नाही.

चक्क कट्ट्यात येऊन माझे छंद याची देही याची कर्णी ऐकूनही तुम्हाला हा प्रतिसाद द्यावासा वाटला आणि तो तुम्ही कृतीतही आणलात याचं खूप कौतुक वाटत आहे. माझे छंद इतरांना कळूनही ते असे अलोट यशस्विता देऊ शकतात हे कळल्याने जब्बरी आनंद झाला आणि तुमच्याबद्दल माझे विचार बदलावे लागले याबद्दल थोडंसंच वाईट वाटलं.

मला कोणी काय संबोधलं तर आक्षेप घ्यायचा आणि कधी नाही, हे पूर्णतया माझ्या हातात आहे. आक्षेपार्ह्य नसलेले बदल माझ्या लेखी महत्त्वाचे नाहीत, त्यानंतर लिहिला गेलेला मजकूर महत्त्वाचा.

दिग्गज मनोगतीदेखिल कधीकाळी व्यक्तीपरत्वे/लेखपरत्वे संबोधने बदलायचे. त्यांच्या त्या वर्तनावर कधीही कोणीही आक्षेप घेतला नाही, आजही घेत नाहीत. त्यांच्या नंतर बदललेल्या वर्तनाची नोंद जरी सर्वांनी घेतलेली असली तरी इथे ती खासकरून नमूद करण्याचे कोणी केलेले नाही. हे महान कार्य काही ठराविक मनोगतींबद्दलच चाललेले आहे, हे आपल्या या प्रतिसादाने सिद्धच झाले आहे जणू. सर्वच गोष्टींबद्दल अनेकोत्तम धन्यवाद.