जान्हवी,
सगळेच पुरुष आणि सगळ्याच स्त्रिया सारख्या नसतात. काही ठिकाणी वरील वाक्य उलट ही सत्य असते. पण आपल्याला अनुभव आला कि, जगातील सर्व स्त्रिया/पुरुष असेच,असे गृहित धरून चालणे बरोबर नाही ना! पण दूधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून पिणे कधीही योग्यच. सहनशीलता हा स्त्रियांचा गुण आहे पण आक्रस्ताळेपणा करणे हा अवगुणही त्यांच्याच ठायी आहे. शेवटी प्रत्येकाच्या अंगी गुण आणि अवगुण असतातच. कदाचित तुमच्या मैत्रिणीचा अनुभव तसा असेल परंतु म्हणून हे सार्वकालिक सत्य आहे, हे मात्र पटत नाही.
श्रावणी