कथा छान जमली आहे.
पुण्यात राहणाऱ्या लोकांना जिलब्या गणपती वगैरे काही तपशील कदाचित चुकीचे वाटतील, पण कथेच्या विनोदी प्रकृतीच्या दृष्टीने तो मुद्दा गौण आहे.
'घरगुती उपयोगासाठी -- आपल्या माणसासाठी! -- बालकविता बालगीत लेखन' असा काहीतरी शेवट होईल असा एक अंदाज होता!
कविसंमेलनाचे आणि लग्नानंतरच्या अवस्थेचे वर्णन कथनातून / निवेदनातून जास्त आले आहे, त्या ऐवजी घटनांतून / संवादांतून आले असते तर आणखी मजा आली असती.
ह्या गोष्टीवर सुंदर विनोदी एकांकिका होऊ शकेल असे वाटते! तुम्हाला एकांकिका लिहिण्याचा अनुभव आहेच म्हणा!