तुमच म्हणण बरोबर आहे. प्रेम कर्ण हा गुन्हा नाही. पण वाढत्या वयात मुलांना भिन्न लिंगी व्यक्तिबद्द्ल आकर्षण निर्माण होत आणि त्यास ते प्रेम समजुन बसतात.कारण ते सुजाण नसतात आणि त्यात त्यांचा दोष नाही कारण या वयात शरिरात बदल निर्माण होतात व मुलांची मानसिकता आपल्यालाच सर्व समजते अशी होते. ते पालकांशी वादंग घालतात व आपल्या समवयस्कांमध्ये रमतात. म्हणुण पालकांनी आपली मुल प्रेमात पड्ली आहे हे कळल्यावर त्यावर बोंबाबोंब करु नये तर त्यास लैंगिक ज्ञान द्यावे.मागील काही दिवसात काही पालकांचे पेपरात विचार वाचले कि माझ्या मुलीला कॉलेजात मित्र नाही ती सरळ तिथे जाते व सरळ घरी येते. तिला मोबाईलवर पोरांचे निरोप येत नाहीत माझा तिच्यावर विश्वास आहे- हि मानसिकता काय दर्शवते? कि आपण कोणत्या काळात आहोत? आणि सेक्स म्हणजे वाईट,अंधारातली गोष्ट असा विचार आपण मुलांच्या मनावर का बिंबवतो?जी गोष्ट आपण लपवण्यास बघतो त्याबद्दल त्यांना चोरुन माहिती मिळवन्याची ईच्छा व्यक्त होते. मुलांना त्याबद्दल व्यवस्थित सांगितले तर ते वाईट मार्गाला जाणार नाहीत.
चर्चिल