सांगली शहराचे आद्य दैवत असलेले गणपती मंदिर येथिल एक श्रद्धास्थान आहे. सांगलीचे संस्थानिक पटवर्धन राजे यांनी बांधलेल्या या मंदिराचे बांधकाम पंचायत पद्धतीचे आहे. या मंदिराच्या सभोवती आणखी ४ मंदिरे आहेत(सुर्यनारायण, चिंतामणि...इतर दोन आठवत नाहित). मंदिरातील 'बबलू' नावाचा हत्ति प्रसिद्धच आहे. त्याच्यासाठि खास दुरदर्शनची सोय आहे. बबलूच्या 'डिस्कव्हरी' व 'ऍनिमल प्लॅनेट' या आवडत्या वाहिन्या आहेत. लहान तसाच मोठ्यांचा हि बबलू आवडता आहे. मंदिराच्या प्रबंधक समितिने केलेल्या सुधारणांमुळे मंदिराचा परिसर नयनरम्य आहे. बबलू हत्तिच्या राहण्याच्या ठिकाणाजवळ 'केंगणेश्वरी' देविचे मंदिर आहे, सांगलीतील बऱ्याच कुळांची हि कुलदेवता आहे. मंदिराच्या मालकिचे उंट, घोडे, ससे इ. प्राणिही येथे आहेत. एक बघणीय स्थळ...

सांगलीपासून जवळच 'बागेचा गणपती' म्हणून आणखी एक गणपती मंदिर आहे. हे खरे संस्थानिकांचे पुर्विपासूनचे दैवत. येथूनच पुढे हरिपूर नावाचे छोटे गाव आहे. येथिल शिवमंदिर प्रसिद्ध आहे. श्रावण मासात दर सोमवारी येथे जत्रा भरते. वरिल तिन्हि स्थळे कृष्णेच्या काठि आहेत.