सगळे पुरुष सर्रास खोटं बोलतात असे म्हणणे मला तरी अन्यायकारक वाटते. काही पुरुष असतील ही असे, पण म्हणून सगळ्यांना त्यांच्या रांगेत नेऊन बसवणे पटत नाही. मला तरी कुणाकडून असा कटू अनुभव आलेला नाही, त्यामुळे मी तुमच्या ह्या मताला समर्थन देणार नाही.
> स्त्री हिच स्त्रिची दुश्मन आहे हे खर आहे
चर्चिल, तुमचे हे विधान ही पटले नाही. सासू-सुनांमध्ये भांडणं होतात, तसे सासू-सासऱ्यांचे जावयाशी होत नाही हे बरोबर आहे. पण ज्यांच्याबरोबर आपण थोडासाच वेळ घालवतो, त्यांच्याशी वाजण्याचे प्रसंगही थोडकेच असतात. आपल्याकडच्या समाजरचनेमुळे असेल किंवा इतर काही कारणांनी, सून आणि सासरा हे नातेदेखील तितकेसे जवळचे नसते, त्यामुळे तिथेही वाद उद्भवत नाही. आई मुलीला काम करायला सांगते मुलाला नाही ह्यात देखील समाजरचनेचाच हात आहे. पण हल्ली घरात हे चित्र दिसत नाही. निदान माझ्याबाबतीत तरी असा भेदभाव झालेला नाही. हुंडाबळी घेण्यात सासूचा जितका हात असतो तितकाच मुलाचा आणि सासऱ्याचादेखील. फक्त आई सांगते म्हणून कुणी बायकोचा जीव घेणार नाही. त्यात स्वतःची मर्जी सामील असणे गरजेचे आहे. आणि असे नसेल तर बुद्धी गहाण टाकणाऱ्या अश्या पुरुषांची मला खरंच चीड वाटते.
> आणि पुरुष घरात लहानसहान गोष्टीत लक्ष घालत नाहीत
चर्चिल तुमचा हा मुद्दा मला पटतो. पण हे आजच्या मध्यमवयीन पिढीपर्यंतच लागू होत असावे. घरात लक्षच घातले नाही तर तिथे घडणाऱ्या गोष्टींचा राग येण्याची आणि वाद होण्याची वेळच येणार नाही. हो ना? आजच्या पिढीत मात्र असे चित्र दिसत नाही. नवरा-बायको दोघेही नोकरी करत असल्यामुळे पूर्णपणे बायकोवर घर टाकून नवरे मोकळे होत नाहीत. त्यांचा घरातला सहभाग वाढतो आहे आणि ही खरेच चांगली गोष्ट आहे.
माझी ही मते स्वानुभावानं बनलेली आहेत, एखाद्याला पटणारही नाहीत. पण मला जान्हवी आणि चर्चिल ह्या दोघांचेही लिखाण टोकाचे वाटले म्हणून मत मांडले.