मी पुन्हा खरं बोलेन पण तरीही नाही जिंकणार
तो पुन्हा खोटं बोलेल आणि मला निरुत्तर करणार

बाप रं बाप..म्या अडान्याला कायबी झेपना बगा ह्ये...त्ये नक्की काय जीकनार म्हनायचं आपन? मला तर वाटलं की काय कुस्तीचा फड बीड लावलाय का काय शहराकडं? पुनांदी वाचल्यावर कळाल कायतर येगळच हाय हे!

अवं ताई, ह्यी असली भांडनं जीकन्या हारन्याच्या इर्षेने करायची नसत्यात! आनि (तुमचा) त्यो खोटं बोलला म्हनून पाक सगळी मानसं खोटारडी नसत्यात! (जसं आमची ही झूनका झनझनीत फर्मास बनीवते म्हनून काय सगळ्या बाया सुगरन नसत्यात!)

आनि हे इनोदापुर्त बरका!- हीतं आपल्या टोळक्यातबी बी एक 'त्यो' हायेच की... आयशान खोटं बोलताना अजुनतरी गावला न्हाई बगा.̱..

तुमचा,

(प्रामानीक) खेडूत.