"बी" जलप्रपात, पचमढी

मध्यप्रदेशात असलेले पचमढी हे थंड हवेचे ठिकाण नागपूरपासून सहा-सात तासांचे अंतरावर आहे. वनश्रीने नटलेल्या नयनरम्य पर्वतराजी  आणि सुंदर जलप्रपातांसोबतच येथे अनेक मंदिरे आहेत. चौरागड, गुप्त महादेव, मोठा महादेव, जटाशंकर अशी अनेक मंदिरे अतिशय निसर्गरम्य परिसरात आहेत. राहण्या-खाण्याची सोय अगदी उत्तम आहे. खाजगी तसेच मध्यप्रदेश पर्यटन विभागाच्या विश्रामगृहांचे आरक्षण नागपूरहून होते. कमीतकमी चार दिवसांचा कार्यक्रम हवा.

उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण, हिवाळ्यात निसर्गसौंदर्य- ट्रेकिंग आणि पावसाळ्यात पावसाची वेगळीच मजा पचमढीला अनुभवता येते.

http://www.rajendrapradhan.com/photo/pachmadhi.htm येथे पचमढीची इतर छायाचित्रे बघता येतील.

राजेन्द्र