गोंड राजा वीरशहाची समाधी
चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर, अंचलेश्वर आणि गोंड राजांचे समाधीस्थळ ही प्रसिद्ध स्थळे. एक अप्रसिद्ध परंतू अतिशय सुंदर शिल्पकलेने नटलेले लहानसे शिवमंदिर बाजाराजवळ एका गल्लीत आहे. http://www.rajendrapradhan.com/photo/markanda.htm येथे तुम्हाला ह्या स्थळांची छायाचित्रे बघता येतील.
ह्याशिवाय चंद्रपुरातील एक अप्रसिद्ध परंतू आवर्जून बघण्यासारखे स्थळ म्हणजे रायप्पा कोमटी ह्यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बांधकाम सुरू केलेले पण अपूर्ण राहिलेले मंदिरस्थळ. येथे महाकाय मूर्ती ऊन्ह, धूळ आणि पावसाचा मारा सहन करीत उघड्यावर पडून आहेत.
जवळपास तीस फूट उंचीच्या नवमुखी दूर्गेच्या मूर्तीला रावण समजून दसऱ्याच्या दिवशी लोक दगड मारीत. त्यामुळे मूर्तीला क्षति पोचली आहे. ह्याशिवाय महाकाय आकारच्या गणपती, वराह, मत्स्य आणि इतर मूर्ती तिथे आहेत.
राजेन्द्र