सर्वसाक्षी महोदय, आपला प्रकल्प उत्तम आणि स्तुत्य आहे.

बव्हंशी शब्द स्वीकारार्ह आणि सुंदर आहेत.

काही शब्दांना खालील पर्याय जास्त समर्पक वाटतातः

विसा = राष्ट्रप्रवेशपत्र

क्रेडिट कार्ड = पतपत्र

बोर्डिंग कार्ड = स्थानग्रहण पत्र

अपडेट = अद्ययावत माहिती

गिअर = दातेरी चक्रे

गिफ्ट पॅक = भेट वेष्टण

हार्ड वेअर = साधन सामुग्री

सॉफ्ट वेअर = कार्यप्रणाली सामुग्री

स्केच पेन = रेखन झरणी

बॅनर = फलक

वेब डिझायनर = महाजाल अभिकल्पक

हँगर = खुंटी, टांगणी, दांडा

मिनरल वॉटर = खनिज पाणी

पॅकेज टूर = सर्वसंयोजित सहल