जयश्रीताई,
सुरेख 'मनोगत' आहे. व्हॅलेंटाईन डे चा प्रसंग अतिशय तरल झाला आहे. बाकीचं वर्णनसुद्धा छान आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असणारी गृहिणीची भूमिका आणि त्या गृहिणीतच वावरणारी आई, पत्नी, प्रेयसी/सखी अशी विविध रुपे नि त्यांच्या भावना यांचे चित्रण, अनुभवकथन छान जमले आहे. अभिनंदन.
सगळी लोकं गेल्यावर मन घराचं बाळंतपण
घराच्या बाळंतपणातून काय सुचवायचे ते कळले नाही.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.