हे मात्र १००% खरे ! फक्त आयुर्वेदाचार्यच नव्हे तर कुठल्याही 'पथी'चे वैद्य वर्ख खाण्यास विरोध करतील हे निश्चित !!!
पण आपल्या काजुकतलीवर वर्ख नुसता सजावटीपुरता लावायचा आहे हो.. खाण्यासाठी नाही.
मिठाईवाले चांदीचा वर्ख वापरतात की ऍल्युमिनिअम चा हा संशोधनाचाच विषय आहे कारण शुद्ध चांदीचा वर्ख महाग असतो. शिवाय असेही ऐकले की वर्ख तयार करण्यासाठी प्राणिज पदार्थांचा की अवयवांचा वापर करतात. त्यामुळे वर्खापासून दूर राहिलेले बरेच !(मांसाहारींनी पहिल्या कारणासाठी आणि शाकाहारींनी दोन्ही कारणांसाठी)
चांदीचा वर्ख खाऊ नये म्हणतात पण चांदीचे अंश पोटात जावे म्हणून तुपाला चांदीचे भांडे, लहान मुलांना चांदीच्या चमच्याने भरविणे असे का ?