वरूण,
हे युध्द आता साहित्यिक 'धर्मयुध्द' न राहता एका निम्न, घृणास्पद, वैयक्तिक पातळीवर उतरले आहे असे वाटते. आपण व आपला शत्रुपक्ष दोघांनीही संयम व परीपक्वता दाखवून हे 'रण' न थांबवल्यास 'मनोगत' चे लवकरच 'पानीपत' होईल आणि 'आपली माणसच आपली माती' करतात हे पुन्हा एकदा सिद्ध होईल.
"मनोगत'चे वृत्तपत्रात जाहीर कौतुक होत आहे. ते वाचून नवीन मंडळी औत्सुक्याने मनोगत कडे ओढली जातील व त्याच वेळी 'मनोगत' वर अशा प्रकारची 'सुन्दोपसुन्दी' पाहून वैतागून दूर जातील व यातच मनोगतचे व पर्यायाने माय-मराठीचे नुकसान होईल हे आपल्या लक्षात कसे येत नाही? 'संयम हा शौर्याचा एक भाग आहे' इंग्रजीत अशा अर्थाची म्हण आहे.
मी व माझ्यासारख्या इतर अनेक मनोगतीना 'मनोगत' हे माय-मराठीचे एक पूजास्थान,गाभारा वाटतो. (आता त्याचा 'आखाडा' होऊ न देण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे.) इथे चाललेली ही अशी 'देवळातील बडव्यांची भांडणे' पाहून येणाऱ्या 'भक्ताचे' मन उद्वीग्न होऊन तो देवळाकडेच पाठ फिरवेल! अशी वेळ येऊ देऊ नये म्हणून आपल्याला ही कळकळीची विनंती! (अब बस करो,यार,बस करो.दो गझलकारों मे 'इस' कदर की दुश्मनी समझ मे नही आती!)

(व्यथित) जयन्ता५२