पेंटर = रंगलेपक, मग मराठीतल्या रंगारीचा काही वेगळा अर्थ आहे का ?

जॅक ऑफ ऑल हे जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन चे लघुरूप असल्याने तिथे अष्टपैलू हा शब्द विरोधाभास निर्माण करतो.

 वेटर - वाढपी / परिचारक .. वाढपी हा सोपा सुटसुटीत आणि कळण्यासारखा आहे.. सर्वसामान्यांना परिचारक हा शब्द कळणार नाही असे वाटते. शिवाय 'नर्स' साठी वापरल्या जाणाऱ्या परिचारिका या शब्दाशी गफलत होण्याची शक्यता आहे.

पर्यायी मराठी शब्द सर्वसामान्यांनी वापरावे असे वाटत असेल तर जिथे शक्य आहे तिथे संस्कृतमधले अवघड शब्द वापरण्यापेक्षा मराठीतलेच तसा अर्थ/वस्तू/ठिकाण इ. दर्शविणारे शब्द वापरायला काय हरकत आहे ? शिवाय इंग्लिश शब्द 'एकाच' मराठी शब्दात व्यक्त व्हायला हवा असा अट्टहास असता कामा नये. एका शब्दात व्यक्त करायचे झाल्यास तो शब्द अतिशय बोजड होतो असे आपले मला वाटते.

जसे वन्स मोअर ला पुनराग्रह.. त्यापेक्षा पुन्हा एकदा/परत एकदा असा द्वारकानाथ यांनी सुचविलेला शब्द जास्त सोपा आहे.

मिनरल वॉटर साठी भूतलीय / खनिजयुक्त 'पेयजल' असे म्हणण्यापेक्षा नुसते भूतलीय / खनिजयुक्त पाणी म्हटले तर चालणार नाही का ? वरूण यांनी सुचविलेला 'बाटलीबंद पाणी' पण चालू शकेल कारण ते त्याच स्वरुपात मिळते. दर वेळी शब्दशः भाषांतराची गरज नाही असे वाटते.

वीक पॉइंट साठी कच्चा दुवा स्पर्धेच्या संदर्भात बरोबर आहे. आवडी-निवडीच्या बाबतीत 'प्रिय' किंवा 'आवडता/ती/ते' हे शब्द कसे वाटतात ? जो शब्द इंग्लिश मधे '२-३ वेगवेगळ्या अर्थाने' वापरला जातो त्यासाठीचा पर्यायी मराठी 'एकच' शब्दही त्या २-३ अर्थाने वापरता यावा असाही अट्टहासही नसावा असे वाटते.

रिफील - भरणी शब्द आवडला. पेनाची रिफील या अर्थाने आहे का ? जर क्रियापद असेल तर 'पुन्हा भरणे' असे वापराता येईल.  पुनर्भरण वगैरे वापरून  बोली भाषा बोजड केली जाऊ नये असे वाटते. लेखी भाषेत एक वेळ ठीक आहे. 

हँगर - टांगणी आवडला.
स्टेपलर - टाचक, पंच मशीन - छिद्रक आवडले.

डिझाइनर - अभिकल्पक.. माझ्यासाठी तरी हा शब्द खूप अवघड आहे. डिझाइन(बांधकाम, वेब, फर्निचर इ.) - आराखडा असा शब्द प्रचलित असल्याने डिझाइनर - आरेखक, डिझाइनिंग - आरेखन, कापडावरील डिझाइन - नक्षीकाम,  फर्निचर, दगड, मूर्ती इ. - कोरीवकाम. दर वेळी योग्य संदर्भ लक्षात घेऊन शब्द वापरायला हवा.

टेक अवे - बांधून घेणे/देणे.

टॉक टाईम - या प्लॅन मधे १० मिनिटे टॉक टाईम आहे --हे बोली-लेखीभाषेत, या प्लॅन मधे १० मिनिटे बोलता येते / बोल-काळ आहे.

किती टॉक टाईम ? -- किती वेळ बोलता येते ?  / किती बोल-काळ आहे?

माझा टॉक टाईम संपत आला आहे -- माझा बोल-काळ संपत आला आहे.

 स्केच पेन - रेखन झरणी -- लहान मुलांसाठीच नव्हे तर सर्वसाधरण लोकांसाठी अवघड आहे. 'चित्र रंगविण्याचे पेन' म्हणता येईल का ???  

शॉवर बाथ - मी तुषार-स्नान घेऊन येते/तो ????? त्यापेक्षा 'मी शॉवर खाली अंघोळ करून येते/तो' समजायला आणि बोलायला सोपे नाही का ?

नुसत्या शॉवर/ हँड शॉवर साठी कुठला शब्द बरोबर आहे?

गिफ्ट पॅक -----

तुम्हाला एक गिफ्ट पॅक मिळेल -  तुम्हाला एक भेटवस्तू मिळेल.

मला हे 'गिफ्ट' पॅक करून द्या - मला ही 'भेटवस्तू' बांधून द्या.

गिअर - दातेरी चाक असेल तर

गाडी पहिल्या गिअरवर चालव - गाडी पहिल्या दातेरी चाकावर चालव ??
गिअर बदल - दातेरी चाक बदल ??
गिअर वाढव / कमी कर  - दातेरी चाक वाढव / कमी कर ?
रिव्हर्स गिअर - उलटे दातेरी चाक ??

गिअर आहे तसा वापरला तर चालणार नाही का ??

हार्डवेअर -  हार्डवेअर शब्द खिळे, चेन, इत्यादी पासून अगदी संगणकातील इंन्फ्रारेड पोर्ट /  युएसबी पोर्ट वगैरे सर्वसमावेशक आहे. जड साधन-सामुग्री मधील जड नेमका कुठल्या अर्थाने वापरला आहे ??