पर्यायी मराठी शब्द सर्वसामान्यांनी वापरावे असे वाटत असेल तर जिथे शक्य आहे तिथे संस्कृतमधले अवघड शब्द वापरण्यापेक्षा मराठीतलेच तसा अर्थ/वस्तू/ठिकाण इ. दर्शविणारे शब्द वापरायला काय हरकत आहे ? शिवाय इंग्लिश शब्द 'एकाच' मराठी शब्दात व्यक्त व्हायला हवा असा अट्टहास असता कामा नये. एका शब्दात व्यक्त करायचे झाल्यास तो शब्द अतिशय बोजड होतो असे आपले मला वाटते.
सहमत.
वरूण यांनी सुचविलेला 'बाटलीबंद पाणी' पण चालू शकेल कारण ते त्याच स्वरुपात मिळते. दर वेळी शब्दशः भाषांतराची गरज नाही असे वाटते.
सहमत.
वीक पॉइंट साठी कच्चा दुवा स्पर्धेच्या संदर्भात बरोबर आहे. आवडी-निवडीच्या बाबतीत 'प्रिय' किंवा 'आवडता/ती/ते' हे शब्द कसे वाटतात ? जो शब्द इंग्लिश मधे '२-३ वेगवेगळ्या अर्थाने' वापरला जातो त्यासाठीचा पर्यायी मराठी 'एकच' शब्दही त्या २-३ अर्थाने वापरता यावा असाही अट्टहासही नसावा असे वाटते.
सहमत.
रिफील - भरणी शब्द आवडला. पेनाची रिफील या अर्थाने आहे का ? जर क्रियापद असेल तर 'पुन्हा भरणे' असे वापराता येईल.
सहमत.
हँगर - टांगणी आवडला.
स्टेपलर - टाचक, पंच मशीन - छिद्रक आवडले.
डिझाइनर - अभिकल्पक.. माझ्यासाठी तरी हा शब्द खूप अवघड आहे. डिझाइन(बांधकाम, वेब, फर्निचर इ.) - आराखडा असा शब्द प्रचलित असल्याने डिझाइनर - आरेखक, डिझाइनिंग - आरेखन, कापडावरील डिझाइन - नक्षीकाम, फर्निचर, दगड, मूर्ती इ. - कोरीवकाम. दर वेळी योग्य संदर्भ लक्षात घेऊन शब्द वापरायला हवा.
सहमत.
स्केच पेन - रेखन झरणी -- लहान मुलांसाठीच नव्हे तर सर्वसाधरण लोकांसाठी अवघड आहे. 'चित्र रंगविण्याचे पेन' म्हणता येईल का ???
रंगीत पेन!
गिअर - दातेरी चाक असेल तर
गाडी पहिल्या गिअरवर चालव - गाडी पहिल्या दातेरी चाकावर चालव ??
गिअर बदल - दातेरी चाक बदल ??
गिअर वाढव / कमी कर - दातेरी चाक वाढव / कमी कर ?
रिव्हर्स गिअर - उलटे दातेरी चाक ??
गिअर आहे तसा वापरला तर चालणार नाही का ??
मी सुद्धा याच 'गिअर' वर अडकलो आहे!