वरील "वेळेअभावी चर्चेला येऊ न शकलेल्या शब्दां"च्या यादीत "शॅम्पू" हा एक शब्द आला होता. या शब्दासाठी आतापर्यंत (मला वाटते) कोणीही मराठी पर्याय दिलेला नाही.
माझ्या मते या शब्दासाठी मराठी प्रतिशब्दाची गरज नाही. कारण हा शब्द मुळात एका भारतीय भाषेतून इंग्रजीने घेतला, असे कळते.
अवांतर: वरीलप्रमाणेच "मुंगूस" हा शब्द इंग्रजीने मराठीतून घेतला, असेही कळते.
याउलट मराठीतील कित्येक प्रचलित शब्द हे आपण पोर्तुगीज भाषेतून जसेच्या तसे (किंवा अगदी किरकोळ फरकाने) घेतले आहेत, आणि आज ते परकीय आहेत, हे कळतही नाही, इतके ते बेमालूमपणे मिसळून गेले आहेत. जसे: बटाटा, पाव (पोर्तुगीज: पांव), अननस, मेज (किरकोळ फरकाने), नाताळ (किरकोळ फरकाने - 'ल'चा 'ळ' होऊन), पाद्री (किरकोळ फरकाने), काजू, तंबाखू (किरकोळ फरकाने).
- टग्या.