मृदुला,
पोळी फुगल्याबद्दल अभिनंदन. प्रयोग सविस्तर छान लिहिला आहेस. हे जे काही पोळी उलटायचे गणित बसवलेस ना (सेकंदाचे) ते अगदी विनायकप्रमाणेच. एकदा असेच विनायकला पोळी शिकवली कणीक भिजवण्यापासून भाजेपर्यंत, तेव्हा त्याने पण एक पोळी तव्यावर टाकून घड्याळात बघून काही सेकंदाने पोळी उलटण्याचे गणित बसवले. माझ्यापेक्षाही त्याने भाजलेल्या पोळ्या खुसखुशीत व खमंग लागल्या.
रोहिणी