मृदुला,
पोळीबाबतीत तुझा 'शास्त्रज्ञ' दृष्टीकोन मला फार आवडला. मीही पोळीबाबतीत अंतर्मुख होऊन बरेच विचार आणी गणिते मांडली आहेत. पण आता तुझ्या गणितांनी परत प्रयोग करुन पाहीन.
ता.क. मला पोळी बद्दल अमूल्य सल्ले देणाऱ्या मनोगतीसः ताई, माझ्या पोळ्या आता पहिल्यापेक्षा बऱ्या होतात. पण सर्व पोळ्या फुगत नाहीत. पहिल्या चार पोळ्यानंतर तव्याच्या आचेचे गणित जरा बिघडते. तसेच सासूबाईंच्या पोळ्या दुसऱ्या दिवशी डब्यातून काढून बाहेर ठेवल्या तरी मऊ राहतात, माझ्या डब्यातून काढून उघड्या ठेवल्यास दोन तासांनी पापड बनतात.