मनोगताच्या निर्मात्यांचे आणि सर्व मनोगतींचे अभिनंदन.
त्या लेखामध्ये राजकारण, अर्थकारण, चित्रपट, पाककृती यांचा उल्लेख
आहे पण मनोगतावर साहित्याचे (कथा/कविता) प्रमाण याहून जास्त आहे असे वाटते.
युनिकोड या मान्यताप्राप्त आणि विण्डोजसोबत उपलब्ध होणाऱ्या सोप्या पद्धतीने मराठी कसे लिहावे....
ही माहिती तांत्रिकदृष्ट्या चुकीची वाटते. युनिकोड मानके (स्टँडर्डस्) ठरवण्याचे काम युनिकोड
कन्सॉर्शियम ही स्वतंत्र संस्था करते. ही एक नॉन-प्रॉफिट संस्था आहे. भारत सरकार ही सदस्य आहे. शिवाय मनोगतावर मराठी लिहिता येण्यासाठी जावास्क्रिप्ट चा वापर केला आहे असे वाटते. थोडक्यात यापैकी कशाचेही श्रेय विण्डोजला (आणि पर्यायाने मासॉला) देता येणार नाही.
फक्त माहितीसाठी.