हा वड अजून सळसळेल, फोफावेल. अधिकाधिक चांगल्या आणि अद्ययावत सुविधा, सोयी इथे पुरविण्यात येतील. म्हणजे इथे लपाछपी खेळण्याची , पारंब्यांवर झुलण्याची मजा अजून वाढेल.
अधिक कल्पक टोपणनावे बघायला मिळतील पण खऱ्या मनोगतींची संख्या वाढेल. (प्रवासींचे खरे नाव कळेल. सौ. सोनालीताईंची सर्व नावे कळतील. )
मनोगत अधिक लोकप्रिय होऊन इथले साहित्य, चर्चा आणि इतर प्रकारचे लेखन अधिकाधिक वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार होईल. आणि अशी अभिनंदनेही वाढतील.
याची मला पूर्ण खात्री आहे.
अभिनंदन!
चित्तरंजन