अडचण मला तरी एकच दिसते, ती म्हणजे एकदम इतके सारे नवीन प्रतिशब्द येऊ लागले, तर गोंधळ उडू शकेल. पण मग इतके सारे प्रतिशब्द एकदम न आणता हळूहळू आणले तर? (किंवा खरे तर यातील कोठल्याच इंग्रजी शब्दासाठी - अगदी स्टेपलर, पंच मशीनसाठी सुद्धा - मराठी प्रतिशब्द आणण्याची गरज नसावी, इतके ते इंग्रजी शब्द मराठीत रूढ आहेत. पण आता एकदा आणायचेच म्हटले, तर या सर्व प्रतिशब्दांना काय हरकत आहे? शिवाय इंग्रजी शब्दामागे एक रुपया दंड भरण्यापेक्षा अंगचोळ्या, घरझाड्या परवडले. आणि टाचक, छिद्रकापेक्षा टोच्या, भोकपाड्या निदान मराठी तरी आहेत!)

- टग्या.