रोहिणी, माझी अत्यंत आवडती भाजी इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

अवांतर :

श्रावणघेवडा चिरताना इतर भाज्यांप्रमाणे रोखठोकपणे आयताकृती न चिरता तिरकातिरका चिरायचा, जेणेकरून प्रत्येक तुकड्याचा आकार हा १५० अंशाचा एक कोन असलेल्या समांतरभुज चौकोनासारखा (!) होईल. ( माफ करा पण नेमकं शब्दात सांगायला मला ही अशी आडवळणाची भाषा वापरावी लागली ! ) अशी भाजी चिरून केल्यास व नंतर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ओला नारळ टाकून सजवल्यास अप्रतिम चव लागते आणि पोटोरम ( मन - मनोरम तसं पोट पोटोरम ! :D )दृष्टीसौख्यही मिळते. 

स्वयंपाकखोलीत जाणूनबुजून मोजमाप घेऊन काही करणे माहित नसल्याने कोथिंबीर, ओला नारळ वगैरे चिजा चमच्याने मोजलेल्या पाहून जाम हसू लोटलं मला. :D