जे लोक हिन्दीला "आपली" आणी इन्ग्रजी परकीय असे म्हणतात आणि सगळ्या सर्रास वापरात असलेल्या इन्ग्रजी शब्दान्साठी मराठी शब्द वापरण्याचा अट्टाहास करतात त्यान्नी असा विचार करावा कि हिन्दीमधील (विषेशता उत्तर हिन्दुस्थानी) किती शब्द पारशी किवा अरबी आहेत आणी ते का?  उदाहरण म्हणजे हवालदार, वाडी आणी असे अनेक शब्द मला जॉर्डन आणी साऊदी अरेबियात ऐकावयास मिळाले.   जेव्हा भारतात १२०० पासून मुसल्मानान्चे राज्य होते तेव्हा सर्व व्यवहार पारशी-अरबी मधून होता.  आणी या शब्दान्ना जर आपण भारतीय मानतो तर मग सहज समजणार्या इन्ग्रजी शब्दन्चा एवढा द्वेष कशाला?  कदाचित आपण विसरलो असू कि भारतात मुसलमान राजे आले ते परकीय होते.  हे जर खरे नसेल तर शिवाजिने महाराष्ट्राला कोणापसून स्वतन्त्र केले?  प्रश्ण हिन्दी किवा इन्ग्रजी असा नाही तर कोणती भाषा आपल्याला जास्त सम्रुद्ध करेल हा आहे.  ते इन्ग्रजी कि हिन्दी हे तुम्हीच ठरवा.