स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन.
सर्वसाक्षी,
तुम्ही एका व्रताप्रमाणे अशा गोष्टी वेळोवेळी लिहीत असता ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे....
तुमच्या लिखाणात अजून एक जाणवलं - सुरुवातीलाच तुम्ही सावरकरांचा लेखक आणि कवी म्हणून उल्लेख केला आहे! (सावरकरांचीच एक ओळ आठवली..
'की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने!')
आजकाल सावरकर हा फक्त दूरदर्शन इ. माध्यमांतून वितंडवाद घालण्याचा विषय झाला आहे.
एक प्रसंग आठवतोय. मागे एकदा माझ्या एका समवयस्क बंगाली मित्रानं मला विचारलं होतं की सावरकरांचं कार्य काय?
मला या प्रश्नाबद्दल नेहमी दुःख वाटत आलं आहे, कारण प्रांत न बघता मला इतिहासातल्या अनेक गोष्टी आठवतात. हा प्रश्न म्हणजे एखाद्या बंगाली मनुष्याला सुभाषचंद्रांचं कार्य काय विचारण्यासारखं आहे. (मी त्याला वेळ नसल्यामुळे एवढंच म्हटलं - जे सुभाषबाबूंना दुसऱ्या महायुद्धात करायचं होतं ते पहिल्या महायुद्धापूर्वी सावरकरांनी करण्याचा प्रयत्न केला).
पण महाराष्ट्राबाहेर शिवाजीमहाराज, टिळक आणि सावरकर यांच्याबद्दल फक्त अज्ञान आहे. (पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत इ. बद्दल तर बोलायलाच नको... पण एखाद्या बंगाली माणसाला अजूनही खुदीराम बोसांबद्दल विचारून बघा!).
माझ्या एका पंजाबी मित्रानं एकदा मला प्रवासात असताना 'शिवाजीने भी क्या किया? जैसे बाक़ी राज थे वैसाही उसनेभे खुदका राज बनाया' असं म्हणून माझा स्वाभिमान डिवचला होता. त्यानंतर लोणावळ्यापासून पुण्यापर्यंत त्याला माझ्याकडून शिवाजीमहाराजांवर भाषण ऐकावं लागलं होतं.
माझ्या एका मराठी वहिनीला (जिचं शिक्षण मध्य-प्रदेशात हिंदीतून झालं), दिल्लीचा इतिहास हा तिथल्या मुघल राजवटीचा इतिहास म्हणूनच शिकवला गेला. महादजी शिंदे प्रत्यक्ष तो चालवत होते हा भाग तिला ती मराठी असल्यामुळे माहिती होता.
कदाचित हे विषयांतर होत असेल; पण उत्स्फूर्तपणे जसं सुचलं तसं लिहिलं.
सर्वसाक्षी - पुनः तुमचे आभार!
- कुमार