बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे "शिवचरित कथनमाला" हे पुस्तक (जवळपास ४०० पानांचे आहे) चाळंत बसलो होतो.
त्यात त्यांनी पान नं ३२ वर एक उतारा दिला आहे तो येथे देत आहे !

"जिजाऊ साहेबांचे सर्वांकडे जातीने लक्ष होते. मता नावाची मुस्लीम नायकीण पुण्यात होती. तिला खायला अन्न नव्हते. तिला जिजाऊसाहेबांनी अडीच शेरी म्हणजे अडीच शेर धान्य दरमहा कायम देण्याची व्यवस्था केली. तेवढे धान्य तिच्या पोटाला पुरणारे होते. अडीच शेरी त्यांनी ५-६ वर्षांच्या शिवाजीमहाराजांसमोर केली. ही नायकीण ही सुद्धा तुझी आई या भावनेने वागव, ही श्रद्धा त्यांनी त्यातून त्याच्या मनात निर्माण केली."

ही मता नावाची मुस्लीम नायकीण कोण होती- तिच्याबद्दल इतिहासात काहीच कसे नाही ?