कुमार,

चाचा नेहेरू जर 'पिंगला कौन था?' (क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे) असे विचारू शकतात तर इतर सामान्य जनांचे काय?

इथे माझा एक अतिशय निराशाजनक अनुभव मुद्दाम सांगावासा वाटतो. माझा मुलगा साधारण तीसरी वा चौथीत असताना त्याला वेशभुषा स्पर्धेत सावरकर केला होता. सोनेरी काड्यांचा चष्मा, कैद्याचे कपडे, हातात साखळदंड, गळ्यात ५० वर्षे मुदतीच्या शिक्षेची पाटी. माझ्या मुलाने " काय पन्नास वर्षांची शिक्षा? तितकी वर्षे तुमचे राज्य तरी टिकणार आहे का?" हे वाक्य आवेशपूर्ण आवाजात म्हणायचा उत्तम सरावही केला होता.

प्रत्यक्ष वेशभूषा स्पर्धेत मात्र वेगळाच अनुभव आला. मुलगा त्या वेषात रंगमंचावर जाण्यासाठी उभा राहीला तेव्हा मुले कैदी आला असे म्हणू लागली. त्याने लक्ष दिले नाही. मात्र प्रत्यक्ष रंगमंचावर सादर होताना खणखणीत आवाजात ते वाक्य उच्चारूनही अनेक शिक्षकांनाही तो कसली भूमिका सादर करीत आहे हे त्याने सांगीतल्याशीवाय समजले नाही आणि तो खूप हिरमुसला झाला.

घरी आल्यावर त्याने मला विचारले की तुम्ही म्हणत होतात की सावरकर हे युगपुरुष होते, मग ते कोणालाच माहीत कसे नाहीत. माझ्याकडे या प्रश्नावर मान खाली घालण्यापलिकडे उत्तर नव्हते.