सावरकरांना जेव्हा ५० वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा झाली, तेंव्हाचा प्रसंग. त्यांची पत्नी त्यांना भेटण्यास ठाण्याच्या तुरुंगात आली असता, रडत म्हणाली -"कशी जाणार ही ५० वर्षे ? आणि हि शिक्षा आपल्यालाच का?"

तेंव्हा सावरकर उद्गारले - "स्वतःसाठी तर मुकी जनावरे पण जगतात, पण आपला जन्म 'माणसाचा' आहे, आणि त्यात या भारतामधला. मग या देशासाठी जर का आपण स्वतःचा संसार, मुले बाळे या सुखामध्ये न अडकता त्याग केला तर काय हरकत आहे"

धन्य आहे ह्या वीराचे जीवन.

सावरकरांनी ऐन तारुण्यातील २५ वर्षे जेल मध्ये काढली, त्यांच्या सख्या मोठ्या भावाला पण काळेपाण्याची शिक्षा झाली होती, त्यांच्या पत्नीला आणि धाकट्या भावाला इंग्रजांनी प्रचंड त्रास दिला...

आणि आता आठवा आपल्या शाळेतील ६वी की ७ वी मधला एक पाठ्यपुस्तकातला एक धडा 'आनंदभुवनमधील दिवस' की ज्यामध्ये एक परदेशी आवडती बाहुली छोट्या इंदिराने वडिलांच्या सांगण्यावरून परदेशी वस्तूच्या होळीमध्ये अर्पण केल्याचे आणि तीच्या मनातील घालमेलीचे (याचा देशभक्तीशी काय संबंध ?) विवरण केले होते.

म्हणजे एकी कडे देशासाठी संपूर्ण परिवारासहित आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्याची अवहेलना आणि दुसरीकडे एका छटाकश्या बाहुलीचे एवढे कौतिक !

वा रे सरकार !!

नेहरूंच्या देशप्रेमाबद्दल शंका नाहीये, पण फक्त काँग्रेस वाल्यांचीच चाटण्याच्या वृत्तीची किळस येते... छ्या...