चित्त,
छान आहे गझल.खालील शेर फार आवडले.
म्हणूनही सुकू दिली न ओल अंतरातली
चुकून पानपान आठवातले गळायचे

कबूल मी तसा तुझा जुनाच पापिया तरी,
सजा सुनावलीस तू, गुन्हे कधी कळायचे?

अजाणतेपणी मला कुणी हळू खुडेल का?
असेच एकटे किती कुवार दर्वळायचे?

"तशी पुन्हा कुणी कधी इथे न झेप घेतली!"
उदास लाट ऐकुनी समुद्र तळमळायचे

एका कट्टर डाव्याकडून  हा शेवटचा शेर रचला जावा ह्याचा आनंद अधिक.