वाह चित्तोबा!

अतिशय सुरेख गझल...  यातले अनेक शेर पुन्हा पुन्हा वाचावेत आणि मनाशी गुणगुणत रहावेत असे आहेत! मतला खरा कातिल आहे... कितीही वेळा वाचला तरी समाधान होत नाही.... जियो!

'घराकडे जायला', 'पापिया' आणि 'इतस्ततः' फारच सुंदर आणि सहज सोपे शेर...

दोन शेरांबाबत शंकाः

म्हणूनही सुकू दिली न ओल अंतरातली
म्हणूनही या शब्दाने आपल्याला 'या कारणानेसुध्दा' असं म्हणायचं आहे का? (म्हणजे अंतरातली ओल सुकू न देण्यासाठी, आठवांचं पान पान गळू नये हे देखील एक कारण होतं असा अर्थ अभिप्रेत आहे का?). तसा नसेल तर
म्हणून मी सुकू दिली न ओल अंतरातली असा मिसरा अधिक चांगला वाटेल का?

अजाणतेपणी मला कुणी हळू खुडेल का?
या मिसऱ्यामधे, एकटेपणाने दरवळण्यातून जी निराशा आली आहे, त्यातून आलेला प्रश्न / उद्गार आपण मांडला आहे का? तसं असेल तर अजाणतेपणी तरी कुणी मला खुडेल का? हे अधिक योग्य ठरेल का? (माझं दरवळणं बघूनही जाणीवपूर्वक तर कोणी येत नाही, निदान अजाणतेपणी तरी कोणी मला स्पर्श करेल का या अर्थाने)