म्हणूनही सुकू दिली न ओल अंतरातली
म्हणूनही या शब्दाने आपल्याला 'या कारणानेसुध्दा' असं म्हणायचं आहे का? (म्हणजे अंतरातली ओल सुकू न देण्यासाठी, आठवांचं पान पान गळू नये हे देखील एक कारण होतं असा अर्थ अभिप्रेत आहे का?). तसा नसेल तर म्हणून मी सुकू दिली न ओल अंतरातली असा मिसरा अधिक चांगला वाटेल का?

"म्हणूनही" हा शब्द "या कारणानेसुद्धा या अर्थाने वापरला आहे. मी वापरला तर अर्थ मर्यादित होतो असे वाटले.

म्हणजे अंतरातली ओल सुकू न देण्यासाठी, आठवांचं पान पान गळू नये हे देखील एक कारण होतं असा अर्थ अभिप्रेत आहे का?

अगदी हाच अर्थ मला अभिप्रेत होता. त्याशिवाय 'म्हणूनही' वापरल्याने दुसरा अर्थ अडत नाही. म्हणजे एक तर सुकू दिले नाही आणि ती ओल सुकणारीही नसावीच. पण अजून विचार सुरू आहे.

अजाणतेपणी मला कुणी हळू खुडेल का?
या मिसऱ्यामधे, एकटेपणाने दरवळण्यातून जी निराशा आली आहे, त्यातून आलेला प्रश्न / उद्गार आपण मांडला आहे का? तसं असेल तर अजाणतेपणी तरी कुणी मला खुडेल का? हे अधिक योग्य ठरेल का?

हो, अधिक योग्य वाटते, हे खरे. 'तरी' वापरले तर निराशा येते. या निराशेचाच  मी   तरी  न वापरण्यामागे विचार  केला होता. मला तिथे उत्सुकता, आतुरता हवी होती.

(माझं दरवळणं बघूनही जाणीवपूर्वक तर कोणी येत नाही, निदान अजाणतेपणी तरी कोणी मला स्पर्श करेल का या अर्थाने)

हो, म्हणूनच 'तरी' अधिक योग्य वाटेल. आणि हा अर्थ अधिक योग्य आहे. मी तसा बदल करतो. 'मला' मुळे अर्थवृद्धी होत नाही. 'तरी' मुळे ती होते.

खोलात शिरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूपखूप धन्यवाद.