लघूगुरूलघूगुरू असे वृत्त वापरले की वाचायला यायची ती मजा येतेच.
हे वृत्त नादमधुर यात वाद नाही. अनेकांनी वापरले आहे. काहींनीच न्याय केला आहे.
मधले तीन शेर पटकन कळतात. पहिले तीन आणि शेवटचे तीन कळत नाहीत. त्यातले
काही काही तर विचार करूनही कळत नाहीत. किंवा अर्थात शिरल्यावर खोल वाटत
नाहीत.
"दे और दिल उनको, जो न दे मुझको ज़बाँ और" असे म्हणणार नाही पण तुम्हाला काय कळले आणि काय कळले नाही, एवढे तर कळू द्या. कुठे खोल वाटत नाही तेही सांगा.
त्यामुळे गझल सगळ्यांना आवडली असली तरी मी तरी सुधारणेस वाव आहे असेच म्हणेन.
सगळ्यांना सोडा. तुम्हाला काय खटकले ते प्रामाणिकपणे सांगा. ते महत्त्वाचे आहे. कारण सुधारणेस नक्कीच वाव आहे. नेहमीच असतो.
कळावे. असाच लोभ असावा.
चित्तरंजन